Don’t ignore “Hi”

   We have someone who thinks about us. Who always pray for our well-being. But unfortunately we fail to recognize! And that’s why.. don’t ignore “Hi”. Don’t ignore messages.

 

   Don’t ignore “Hi”.

 

   Don’t ignore someone who makes effort to talk with us.

 

एक समोरून येणारं “Hi”

कोणीतरी कुठेतरी हळूच आठवण काढतं
बोलावंसं वाटतंय म्हणून एक “hi” पाठवतं
आणि मग reply ची तासंतास वाट बघतं
कोणीतरी असतंच ना ज्याला आपल्याबद्दल काही वाटतं

 

कधी व्यक्तिमत्त्वाची छाप म्हणा
कधी आपल्याबद्दल ची ओढ म्हणा
कधी मैत्री करावी वाटत असेल
तर कधी मनात दडलेलं प्रेम म्हणा

 

पण कोणीतरी असतं ना जे आपल्याला वेळ देतं
Timepass म्हणून नाही तर आपल्याला समजून घ्यायला येतं

 

आपण नेमकं त्या व्यक्तीला ओळखायलाच चुकतो
Message वाचूनही आपण सहज back करतो
नकळतपणे आपण त्याच व्यक्तीला दुखावतो
आणि आपली ज्यांना काळजी वाटते त्यांच्याकडेच दुर्लक्ष करतो

 

आपण जास्त विचार नाही करत
कारण आपण आपल्याच विश्वात रमलेले असतो
आणि ती/ तो मात्र
आपण असं का वागलो असू ह्यातच गुंतून पडतो

 

मग त्यांचे होतात उगीचचे गैरसमज
उगाच नकोसं असल्यासारखं वाटतं
वाद होऊन दुरावणं तर दूरची गोष्ट
इथे संवाद नसल्यामुळे सगळं बिनसतं

 

ती व्यक्ती मग निघून जाते
शेवटी किती वेळ वाट पाहणार?
आपण मात्र त्यांना गमावून बसतो
मग सांगा हक्काचं कोण राहणार?

 

म्हणूनच…
मनापासून आपल्याशी बोलणाऱ्यांकडे असं दुर्लक्ष करू नका
जे आपल्याशी बोलू पाहतात त्यांना गृहीत धरू नका
मृगजळामागे धावताना आपल्या माणसांना ओळखायला चुकू नका
आणि समोरून येणाऱ्या “hi” ला नेहेमीच timepass समजू नका

 

-सुकन्या सावंत

   Watch on YouTube-

To read and watch more such interesting poems, do follow this website and also follow me on instagram, facebook and subscribe on youtube. Keep reading this blog for the entire poetry which i post on all sites.

 

Also read-

Introduction to the blog Rhyme Chime

Happy Raksha Bandhan! -Treat brother/sister equally..

4 Replies to “Don’t ignore “Hi””

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *