Happy Raksha Bandhan! -Treat brother/sister equally..

    Happy Raksha Bandhan. Treat brother/sister equally

Indian tradition gives immense importance to every relation. One such relation is of brother and sister. But with the changing world; may it be brother or sister, shouldn’t we treat them equal? Treat brother/sister equally.

Happy Raksha Bandhan.. treat brother/sister equally !!!

 

बऱ्याच वर्षांपूर्वी मी एक हट्ट धरला होता!!

माझ्या मैत्रिणींना रक्षाबंधनला भावाला राखी बांधताना बघून, त्यांना मिळालेली ओवाळणी ते दुसऱ्या दिवशी शाळेत दाखवताना मला खूप वाटायचं की मलाही भाऊ हवा. तसे भावंड आहेत बरेच पण सख्खा भाऊ असायला हवा…. ज्याच्यासोबत मी खेळेन, हक्काने त्याच्यावर ओरडेन, मायेने अभ्यास घेईन आणि खूप खूप प्रेम देईन! अगदी २४ तास माझ्या सोबत असेल, मी बिनधास्त कामं सांगेन आणि तो माझं ऐकेल!!

काही वर्षांनी माझ्या घरात एका मुलीचा जन्म झाला. भाऊ नाही, पण बहीण घरात आली. जशी ती मोठी होत गेली तसा तिच्यातला मिश्किलपणा हा एखाद्या भावापेक्षा कमी नाही हे मला जाणवलं. तिची चालणारी मस्ती, तिचं रोखठोक बोलणं, लहान असताना अगदी मुलांसारखीच फिरायची. एकदा stage वर announce पण केलेलं की सुकन्या तिच्या भावासोबत आलीये certificate घ्यायला!!!

तेव्हापासून आम्ही एकमेकींना राखी बांधतो. एकत्र खेळतो, सगळंकाही share करतो, कधी कधी भांडतो पण एकमेकींची काळजी घेतो. हा आणि कामाचं म्हणाल तर… actually most of the times madam order सोडतात आणि मला करावी लागतात!

बऱ्याचदा असं होतं लोकं विचारतात की दोन्ही मुलीच का? मुलगा नाही का? पण तेव्हा माझे आईबाबा अगदी ठामपणे सांगतात, “आम्हाला मुली आहेत ह्याचा आनंद आहे आणि आमच्या मुलींचा आम्हाला अभिमान आहे.”

खरंच… असं कोण म्हणतं की रक्षा करायला भाऊच हवा? माझ्या बहिणीला भेटा तरी एकदा!! शेवटी भाऊ काय, बहीण काय.. ते महत्त्वाचं नाही. आपल्याला आपलं वाटणारं, हक्काचं कोणी असणं महत्त्वाचं!

जे बंधन असूनही कधी बंधन वाटत नाही.. ते नातं म्हणजे भावंड…

Happy Rakshabandhan!!!

 

Also read-

Introduction to the blog Rhyme Chime

Don’t ignore “Hi”

7 Replies to “Happy Raksha Bandhan! -Treat brother/sister equally..”

  1. भाऊ काय, बहीण काय.. ते महत्त्वाचं नाही. आपल्याला आपलं वाटणारं, हक्काचं कोणी असणं महत्त्वाचं!
    👆 So true 👍👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *