Welcome to the blog Rhyme Chime.
Here is a brief introduction to the blog Rhyme Chime! Rhyme Chime is an abode for all the readers.
पश्चिमेचा सूर्य अस्ताला जात होता. काचेतून सारं जग केशरी रंगाचं दिसत होतं. Coffee mug मध्ये फेसाळलेली coffee होती. आणि ती मात्र पुस्तकात गढून गेली होती.
“असं काय आवडतं तुला पुस्तकात वाचायला”, त्याने विचारलं. “असं काय आहे त्या काल्पनिक गोष्टीत रमण्याजोगं? साध्या सोप्या गोष्टी सुद्धा मोठे मोठे शब्द वापरून complicate करतात”.
तिने शांतपणे ऐकून घेतलं. तो जेव्हा बोलत होता तेव्हा तिच्या गाली एक स्मितहास्य तरळत होतं. हो, कारण त्या शब्दांच्या विश्वात हरवून जायला तिला रुचत होतं, क्षणभरासाठी का होईना स्वतः कोणी एक पात्र म्हणून जगायला तिला आवडत होतं. म्हणूनच ती फक्त ऐकत होती आणि त्याचं बोलून होताच तिच्या मृदू आवाजात ती उत्तरली-
“पुस्तकं! तसं बघायला गेलं तर एकत्र केलेले कागद. त्यावर लिहिलेले शब्द. हा पण तेच शब्द आपलेसे वाटण्यासाठी ते सुंदर प्रकारे गुंफणं गरजेचं असतं. कथा काल्पनिक का असेना, ह्या जगात वावरताना काही शिकवून जाते. कधी आपण न अनुभवलेली भावना आपल्याला देऊन जाते, कधी आपण न पाहिलेली जागा आपल्याला दाखवून जाते, कधी मनातल्या भावनांना डोळ्यातील पाण्यावाटे वाट देते तर कधी खोलवर लपलेलं हसू ओठावर आणते.
म्हणूनच आवडते मला पुस्तक. शब्द कठीण असतात असं नाही काही. कधी कधी त्या प्रसंगाला न्याय देण्यासाठी ते ते शब्द वापरावे लागतात.”
“शब्द, कविता, कथा ह्या सगळ्यावर तुझ्याशी उपजत कोण घालेल”, तो म्हणाला.
त्यावर ती ताडकन म्हणाली, “नकोच ना मग! शब्दांची गंमत ही वेगळीच असते. यमक जुळलं की कविता होते, नाही जुळलं तरी मुक्तछंद! मी अशा काव्यमय सफरी वर चाललेय. कधी कविता, कधी छोट्या कथा, कधी फक्त व्यक्त होणं तर कधी सामाजिक बांधिलकी म्हणून लिहिणं, मग त्याला भाषेचं बंधन नाही. तू येणार?”
त्याने विचारलं, “म्हणजे?”
“म्हणजे… ह्या blog ला भेट देत जा अधून मधून कळेलच की….!” तिने सांगितलं.
So keep following www.rhymechime.com
Also read-
I am now not sure the place you’re getting your info, but good
topic. I must spend a while finding out more or understanding more.
Thank you for great information I used to be in search of this
info for my mission.
Feel free to visit my site – Royal CBD
Thank you.
The content is purely original written by the blogger herself.