Love poetry – Hrudayacha Thoka

 

Love poetry – Hrudayacha Thoka

Hrudayacha Thoka - Sukanya Sawant

Everyone of us have fallen in love, or will fall in love sometime in life. We all have experienced that butterfly feeling after seeing someone. So read this poetry (Hrudayacha Thoka), and feel the same again. 

 

स्वतःच्याच धुंदीत असताना
एक सुंदर मुखडा पाहिला
माझे मलाच कळले नाही
कधी हृदयाचा ठोका चुकला

पाहता क्षणी हेच वाटले
मी राधा, तू कृष्ण
का मला छळू लागलं
तुझं हे सामोरी नसणं?
मजनू-लैला चे सरले दिन
सरले बाजीराव-मस्तानी
स्वप्नी माझ्या आता दिसे
धुंद झालेले फक्त तू अन् मी
तुझे हसणे पाहून
मी माझा भानच विकला
माझे मलाच कळले नाही
कधी हृदयाचा ठोका चुकला

माहीत नाही मजला
कधी ह्या जुळतील रेशीमगाठी
कधी सुगंधी प्रीतीचा निरोप
देईल ओली माती
आता त्या पक्षांचा किलबिलाटही
न वाटे गोड
कानी रुळणारा तुझा आवाज
न त्याला कशाची तोड
तुझ्या मनाचे गोड गुलाबी
देशील का गुलाब मजला?
माझे मलाच कळले नाही
कधी हृदयाचा ठोका चुकला

कळतील का तुला मौनाचे शब्द
जे अडकले माझ्या ओठी?
कधी उमगेल का तुला
माझ्या मनात दडलेली प्रीती?
साद घालणारे माझे सूर
कधी तुज ऐकू येतील का?
बेभानलेल्या कवितेतील शब्द
तुजला ओढून आणतील का?
तुझा विचार करता क्षणी
रिमझिम पाऊस बरसला
माझे मलाच कळले नाही
कधी हृदयाचा ठोका चुकला

सुकन्या सावंत

 

  • P.S. – This love poetry named Hrudayacha Thoka is from the copyrighted book “Kavitanchya Shodhat“.

Do watch it on youtube-

 

  • Also read-

Don’t ignore “Hi”

Vaata Sequel Song – Tu Ashi (Song Review)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *