Marathi love poetry – Aaplya Priticha Sugandha

Marathi Love Poetry- Aaplya Priticha Sugandha

This is a love poetry in marathi language written by Sukanya Sawant. Aaplya Priticha Sugandha – which means fragrance of our love. Everyone has a love story with its different touch. So enjoy this love poetry named Aaplya Priticha Sugandha.

 

तू येता असे सामोरी
गाली हसू उमटून जाई
हृदयातील धडधड वाढे
असे शहारून येई
परि नाही कोणा ठाऊक
हा गोड आपुला बंध
कसा दडवू तू रे सांग
आपल्या प्रीतीचा सुगंध

माझे जरासे लाजणे
तू हळूच टिपूनि घेता
कोणी पाहिले तर मी सांगे
सहज योगायोग होता
तू बोलताना तुझ्या मुखी
वेगवेगळे भाव
गर्दीमध्येही माझा चाले
खुणा वेचण्याचा सराव
कसे दडवू तू रे सांग
हे गोड आपुले नाते
चांदण्यांना चमचमण्यापासून
सांग कसे रोखले जाते

मी तुझ्याबद्दल खरं तर खूप बोलते
पण नाव कधी कोणा सांगत नाही
तुझा उल्लेख कधी कोणाकडून झाला
तर गालावर लाली आल्यावाचून राहत नाही
कितीही कुपीत जरी आपण दडवलं
प्रेमाचं सुगंधी अत्तर
आसमंतात तर दरवळायचंय
बस काही काळानंतर

-सुकन्या सावंत

 

Watch on youtube-

 

Igtv-

Watch on IGTV

Also read-

Love poetry – Hrudayacha Thoka

Don’t ignore “Hi”

What to do in lockdown? – song review (Kya baat hai!)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *