Vaata Sequel Song – Tu Ashi (Song Review)

Vaata Sequel Song – Tu Ashi (Song Review)

   So here we go with yet another song review. One from my favourites list. Sequel of the famous song Vaata – Tu Ashi.

” वाटा जागलेल्या
तुझ्या भोवताली…” 🥰

Vaata Marathi Single

हे गाणं मी पहिल्यांदा TV वर पाहिलं. इतके सुंदर शब्द, हरवून जाऊ असं music आणि त्यासोबत background ला एक मस्त story!! 😍

अभिषेक करंगुटकर, अवनी करंगुटकर, केवल वाळंज, सुशांत बापर्डेकर, कुणाल देवळकर, सिद्धी दळवी अशा भन्नाट team ने दिलेला मस्त music project! 😃

त्या कथेत आपण स्वतःला कुठेतरी पाहू लागतो. सहज connect होऊ इतका relatable विषय! अगदी कोणाच्याही आयुष्यात घडू शकेल, किंवा बहुतेक घडलं ही असेल! 😉

बऱ्याचदा असं होतं की मनात असलेल्या गोष्टी आपण ओठापर्यंत येऊच देत नाही. समोरच्याला काय वाटेल, आता ही वेळ नाही अशा बऱ्याच कारणाने राहून जातं. योग्य वेळी व्यक्त न झाल्यामुळे आपल्या हातून बऱ्याच गोष्टी निसटून जातात, आणि कधी ती आपली आवडती व्यक्ती असते. म्हणून वेळीच व्यक्त व्हा हे ह्या गाण्याने शिकवलं. 😇

गाण्यात खरंतर ती निघून जाते पण शेवटी तिला कळतं की त्याला ती आवडते आणि तिथेच गाणं संपतं! मग ते भेटतील का? त्यांची story पूर्ण होईल का?? असे प्रश्न आपल्याला पडतात कारण आपण स्वतःला तिथे पाहत असतो.

पण ह्या प्रश्नाचं उत्तर Vatekars घेऊन आलेत. “वाटा”च्या sequel –

“तू अशी” ह्या गाण्यातून. 😍

Tu Ashi - Vata Sequel

“तू अशी” हे गाणं काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं. पुन्हा आवडते चेहरे, आणि वाटेकर घेऊन आले “वाटा” च्या पुढची गोष्ट!!

Tu Ashi Marathi Single

ती गोष्ट नेमकी काय आहे हे मी सांगणार नाही तुम्हीच बघा आणि गाण्याचा आनंद घ्या..!
एकच सांगेन… अजून एका sequel ची अपेक्षा नक्कीच करू शकता. 😉

 

Also read-

brother/sister equally..

2 Replies to “Vaata Sequel Song – Tu Ashi (Song Review)”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *